Relationship Tips: मुलांच्या या सवयींवर मुली लगेच पडतात प्रेमात

सकाळ डिजिटल टीम

जी मुले सर्व लोकांचा आदर करतात, मुलींना फक्त त्यांच्याशीच मैत्री करायला आवडते.

सर्वांचा सन्मान आणि आदर करणारा मुलगा कधीच चुकीचे वागू शकत नाही याची त्यांना कल्पना असते. 

काळजीवाहू स्वभावाची मुले मुलींना खूप आवडतात. मुली अशा मुलांच्या शोधात असतात जे त्यांची काळजी घेतील आणि त्यांना प्रत्येक परिस्थितीत साथ देतील.

मुलींना मुलांनी प्रामाणिक राहणे आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी शेअर करणे आवडते. दुसऱ्या मुलीशी फ्लर्ट न करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

मुलांनीही आपल्याप्रमाणे स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे असे बहुतांश मुलींना वाटत असते. मुलांच्या ब्रँडेड कपड्यांपेक्षा जास्त मुली त्यांच्या या सवयीने प्रभावित होतात.

मुलींना भावनिकदृष्ट्या मजबूत असलेले मुले आवडतात. निर्णय घेण्यास असमर्थ असलेल्या आणि मुलींप्रमाणे वागणाऱ्या मुलांपासून मुली दूर राहणे पसंद करतात. 

मुलींनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून त्यांच्याकडे लक्ष देणारी मुले त्यांना खूप आवडतात.

फक्त स्वतःच सतत बोलणे आणि समोरच्याचे काही न ऐकणे, अशा वृत्तीच्या मुलांचा मुलींना राग येतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.