धनश्री भावसार-बगाडे
आज खरं तर प्रभू येशू ख्रिस्ताला रोमन शिपायांनी क्रुसावर चढवलं होतं. तरीही याला ख्रिस्ती लोक शुभ शुक्रवार का म्हणतात?
कारण यादिवशी अनेक भविष्यवेत्यांनी प्रभू येशूच्या बाबत केलेली भविष्यवाणी सत्य ठरली.
येशूंच 12 शिष्यांपैकी फक्त, मार्क, लुक आणि योहान यांनी प्रभू येशूंच्या मृत्यूनंतर व पुनरुत्थानानंतर अनेक वर्षानी त्याचे चरित्र लिहून ठेवले आहे.
मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी शिष्य सुगंधी मसाले लावायला गबरीजवळ गेले तर तिथे त्यांना त्यागाची वस्त्र आढळली.
प्रभू येशूने शांतपणे मृत्यूचा स्वीकार करून त्यावर विजय मिळवत पुनरुत्थान/पुनर्जीवित झाला. म्हणून हा शुक्रवार शुभ मानला जातो.
बऱ्याच लोकांना हे पुनरुत्थान खरे वाटत नव्हते. पण त्यावेळी प्रभू येशूने १२ शिष्य आणि सुमारे ५०० इतर लोकांना दर्शन दिले.
माणसांची संशयीवृत्ती लक्षात घेऊन प्रभू येशू म्हणाले तुम्ही बघितले म्हणून विश्वास ठेवतात. पण जे न बघता विश्वास ठेवतात ते धन्य आहेत.
प्रभू येशूचे मृतामधून उठणं आणि लोकांना दर्शन देणे हे देवत्व, अमरत्व सिद्ध करतं.
मृत्यू पलिकडचे सत्य हा दिवस सांगतो. सत्याचा असत्यावर विजय, प्रेमाचा द्वेषावरचा विजय.
क्रुसखांबावर आपल्या अंतिम घटिका मोजत असताना या दिव्य महात्म्याने ‘हे देवा, यांना क्षमा कर कारण ते काय करतात त्यांना कळत नाही’ असे म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.