सकाळ डिजिटल टीम
द्राक्षांचे घड पाहून तोंडाला पाणी येणं स्वाभाविक आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की, केसांच्या आरोग्यासाठी द्राक्षे खूप फायदेशीर आहेत.
द्राक्ष्यांमध्ये Vitamin C चा स्रोत असतो. त्यामुळे केवळ केसांसाठीच नव्हे, तर त्वचेच्या आरोग्यासाठी देखील द्राक्षे 'टॉनिक' म्हणून काम करतात.
इतकेच नाही तर ज्यांना वजन वाढवायचं आहे, त्यांच्यासाठी गोड द्राक्षे रामबाण उपाय आहेत.
रात्री आणि रिकाम्या पोटी द्राक्षे खाणे टाळावे. मधुमेहाच्या रुग्णांनी द्राक्षे खाऊ नयेत. कारण, त्यामुळे किडनी खराब होण्याचा धोका वाढतो.
थंड वारा केसांमधील ओलावा हिसकावून घेतो. त्यामुळं त्वचेवर मृत पेशींचा थर जमा होऊ लागतो.
अशा परिस्थितीत जर तुम्ही याने मसाज केला, तर तुमच्या केसांमध्ये रक्ताभिसरण चांगले होईल. तुम्ही द्राक्षाच्या बियांच्या तेलाचे 2 ते 4 थेंब केसांना लावू शकता.
द्राक्षांमध्ये Resveratrol सारखे पोषक घटक असतात, जे मेंदूतील रक्त प्रवाह सुधारू शकतात.
द्राक्षांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल असतात. जे कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तदाब कमी करतात.