Aishwarya Musale
तिखट हिरव्या मिरचीमुळे जेवणाची चव वाढते. मिरचीचा वापर जेवणात अधिक प्रमाणात केला जातो.
मिरची जेवणाला तिखट आणि मसालेदार बनवते. भाज्या, डाळी किंवा कोणताही मांसाहारी पदार्थ असो, प्रत्येक डिश स्वादिष्ट बनवण्यासाठी मिरचीचा वापर केला जातो.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जेवणात आपण वापरत असलेल्या हिरव्या आणि लाल मिरच्या या दोनपैकी कोणती मिरची जास्त फायदेशीर आहे? चला तर याबद्दल जाणून घेऊयात.
संशोधनानुसार, मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. पण मिरचीचे नियमित सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिनचे प्रमाण लाल मिरचीपेक्षा कमी असते. ज्यामुळे ती पनसंस्थेसाठी अधिक उपयुक्त ठरते.
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह यासारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. हिरव्या मिरचीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.
हिरवी मिरचीचे नियमित सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्य सुधारते. त्यामुळे लाल मिरचीपेक्षा हिरव्या मिरचीचे सेवन अधिक फायदेशीर मानले जाते.
हिरव्या मिरचीचे सेवन पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. हिरव्या मिरचीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. तसेच बद्धकोष्ठता दूर होते, पचनक्रिया चांगली राहते आणि वजन कमी करण्यासही मदत करते.
हिरव्या मिरचीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. हिरव्या मिरचीचे नियमित सेवन केल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.