पहिल्यांदाच सोलो ट्रिपचा आनंद घेताय? तर, या चुका टाळा

Aishwarya Musale

सोलो ट्रिप

मित्र-मैत्रिणींबरोबर, कुटुंबीयांबरोबर बाहेर फिरायला, ट्रिपला जायला तर सर्वांनाच आवडतं. पण, सोलो ट्रिपचा आनंदा हा काही वेगळाच असतो. काहींना सोलो ट्रिपची सवय असते. मात्र, तुम्ही जर पहिल्यांदा सोलो ट्रिप करणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

Solo Trip tips | Sakal

या गोष्टींची घ्या काळजी

जेणेकरून तुमच्या ट्रिपचा आनंद द्विगुणित आणि संस्मरणीय होईल. अशा वेळी सोलो ट्रिपला जाताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

Solo Trip tips | Sakal

जास्त पॅकिंग करू नका

लांबच्या ठिकाणी ट्रिपला जायच्या नादात अनेकदा आपण सर्वच गोष्टी बॅगेत भरतो. अशाने बॅग तर जड होतेच पण प्रवासाचाही आनंद घेता येत नाही. जास्त सामान पॅक केल्यामुळे तुम्हाला सामान उचलण्यात अडचण येऊ शकते. म्हणून, आवश्यक असलेल्या सामानाचीच पॅकिंग करा.

Solo Trip tips | Sakal

ओव्हर शेड्युलिंग करू नका 

दूरच्या ठिकाणी जायचं म्हटल्यावर सर्वच ठिकाणं फिरावीशी वाटतात. अशा वेळी प्रत्येक मिनीटं खर्च करण्याच्या नादात शरीराला थकवा तर जाणवतोच.

Solo Trip tips | Sakal

पण त्याचबरोबर त्या ठिकाणचा आनंदही घेता येत नाही. त्यामुळे थकून जाण्याची शक्यता असते यासाठी ओव्हर शेड्युलिंग करू नका.. 

Solo Trip tips | Sakal

बजेटचे नियोजन

तुम्ही सोलो ट्रिपला जात असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेटचे नियोजन करणे. त्यामुळे बजेट बनवायला विसरू नका. तसेच, अधिक पैसे घ्यायला विसरू नका. जेणेकरून वस्तूंच्या किंमती कमी-जास्त झाल्यास तुम्हाला फारसा फरक पडणार नाही. 

Solo Trip tips | Sakal

कुटुंबाच्या संपर्कात राहा

सोलो ट्रिपला जाताना आपल्यालाच आपल्याकडे लक्ष द्यावं लागतं. अशा वेळी आपल्या कुटुंबीयांना आपली खूप काळजी असते. यासाठी घरातील कोणत्याही सदस्याशी संपर्कात राहा.

Solo Trip tips | Sakal

प्लॅन बी तयार ठेवा

काहीवेळा असे होऊ शकते की, रिजर्वेशन रद्द झाल्यास किंवा तुम्हाला जागा आवडत नसल्यास तुमच्या प्रवासाचे प्लॅन बिघडू शकतात. त्यामुळे तुमच्या सहलीचा प्लॅन बी तयार करा जेणेकरून तुमच्या सहलीचा आनंदही कमी होणार नाही.

Solo Trip tips | Sakal

'या' फळांच्या सालीही असतात आरोग्यासाठी उत्तम!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solo Trip tips | Sakal
येथे क्लिक करा