गुरूपौर्णिमेचा शुभ मुहूर्त अन् महत्व काय?

Monika Lonkar –Kumbhar

गुरूपौर्णिमा

हिंदू धर्मामध्ये गुरूपौर्णिमेला विशेष असे महत्व आहे.

महर्षी वेदव्यास

गुरूपौर्णिमा ही महर्षी वेदव्यास यांना समर्पित करण्यात आली आहे. कारण, याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. 

त्यामुळे, हा दिवस गुरूच्या प्रती सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. 

यंदा गुरूपौर्णिमा कधी?

उदय तिथीनुसार, गुरूपौर्णिमा २१ जुलैला (रविवार) सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल.

शुभ मुहूर्त

गुरूपौर्णिमेचा शुभारंभ २० जुलैला संध्याकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल आणि २१ जुलैला दुपारी ३ वाजून ४६ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होईल. 

महत्व

महर्षी वेदव्यास यांना वेदांचे निर्माता म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार, महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. 

त्यामुळे, वेदव्यास यांचा जन्मदिन हा गुरूपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस गुरूपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा फार जुनी आहे. 

राधिका मर्चंटची एंगेजमेंट रिंग का आहे खास?

Radhika Merchant | esakal
येथे क्लिक करा.