गुरूपौर्णिमेदिवशी व्रत करता येत नसेल तर या गोष्टी अवश्य करा..

सकाळ डिजिटल टीम

कधी आहे गुरूपौर्णिमा ?

21 जुलै 2024 रोजी गुरूपौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी उपवास आणि पूजा करण्याची परंपरा असून गुरूपौर्णिमेला या गोष्टी सुद्धा करणे आवश्यक आहे.

guru purnima | sakal

गुरूचे महत्व

भारतामध्ये गुरूपौर्णिमेला खूप महत्व आहे. गुरूंच्या ज्ञानाने व मार्गदर्शनानेच जीवनातील अंधार दूर होतो, त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असणे महत्त्वाचे आहे.

guru purnima | sakal

या दिवशी काय करावे

गुरूपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून पूजा करावी. वास्तविक, या दिवशी उपवास करण्याची देखील परंपरा आहे

guru purnima | sakal

स्मरण

गुरूपौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करुन दिवा लावावा आणि नंतर भगवान विष्णूंचे स्मरण करावे.

guru purnima | sakal

वाडिलधाऱ्यांचा आशीर्वाद

गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरुंचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. या दिवशी तुम्ही घरातील वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद देखील घेऊ शकता.

guru purnima | sakal

गीतेचे पठण

गुरूपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गीतेचे पठण करावे, यामुळे बुद्धी तीक्ष्ण होते तसेच मन एकाग्र होण्यास मदत होते.

guru purnima | sakal

नामजप

गुरूपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचं स्मरण करावं, तसेच 'ओम बृहस्पतिये नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करावा.

guru purnima | sakal

प्राप्ती

वरिलपद्धतीने गुरूपौर्णिमेला या गोष्टी केल्याने जीवन यशस्वी, सुखकर आणि समृद्ध बनते

guru purnima | sakal

पनीरचा आंबटपणा कसा दूर कराल?

paneer | sakal
येथे क्लिक करा