Pranali Kodre
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरूचे महत्त्वाचे स्थान असते. गुरू पौर्णिमेच्या दिवशी याच गुरुप्रती आदरही व्यक्त केला जातो. अनेक भारतीय क्रिकेटपटूंच्या यशातही त्यांच्या गुरूचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.
क्रिकेटमध्ये सर्वोत्तम प्रशिक्षकांमध्ये रमाकांच आचरेकर सरांचा समावेश होतो. त्यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित अगरकर, प्रवीण आमरे अशा अनेक क्रिकेटपटूंना मार्गदर्शन दिले आहे.
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा हे आहेत. विराटला क्रिकेटचे महत्त्वाचे धडे देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
मुंबईतील अनेक क्रिकेटपटू दिनेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली घडले आहेत. यातील महत्त्वाची नावं म्हणजे रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर.
ऋषभ पंतच्या यशात त्याचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांचा मोलाचा वाटा राहिला. त्यांनी फक्त पंतलाच नाही,तर आशिष नेहरा, आकाश चोप्रा, शिखर धवन अशा अनेक क्रिकेटपटूंना मार्गदर्शन दिले आहे.
ज्वाला सिंह यांनी पृथ्वी शॉ आणि यशस्वी जयस्वाल यांच्या कारकिर्दीत महत्त्वाचे योगदान दिले.
एएन शर्मा हे माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागचे गुरु असून त्यांची दिल्लीमध्ये ऍकेडमी देखी आहे.