Anuradha Vipat
गुरु रंधावाचं नाव गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिलसोबत जोडण्यात येत आहे.
रंगणाऱ्या चर्चांवर गुरु रंधावा आणि शहनाज यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही
आता नुकतच एक मुलाखतीत गुरु रंधावाने शहनाजसोबत असलेल्या नात्यावर मौन सोडलं आहे.
गुरु रंधावा म्हणाला, ‘जेव्हा लेकं माझ्या डेटिंग आयुष्याबद्दल बोलतात तेव्हा मला चांगलं वाटतं. चाहते माझं नाव जगभरातील मुलींसोबत जोडतात, त्यामुळे मला छान वाटतं.
पुढे गुरु रंधावा म्हणाला, एका मुलाला आणखी काय हवं असतं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गुरु रंधावा याच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर देखील गुरु रंधावा आणि शहनाज गिल यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.
पण आतागुरु रंधावाच्या वक्तव्यानंतर स्पष्ट होत आहे की तो शहनाज गिला हिला डेट करत नाही.