Aishwarya Musale
तुम्हालाही जेवणानंतर आंबट फळं खाण्याची सवय आहे का? संत्री, लिंबू, द्राक्ष किंवा कीनू ही सगळी आंबट फळं आहेत जी खरंतर फार स्वादिष्ट आहेत. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण फार जास्त असतं.
ही अशी फळं आहेत जी शरीरातील कोलेजन वाढविण्यासाठी फार मदत करतात. शरीरातील लोहाची कमतरता वाढविण्यासाठी तुम्ही या फळांचं सेवन करू शकता. जरी आंबट फळांचे अनेक फायदे असतील पण जेवणानंतर तुम्ही कधीही ही फळं खाणं योग्य नाही.
आज आम्ही तुम्हाला जेवणानंतर आंबट फळं खाण्याचे नेमके काय दुष्परिणाम होतात हे सांगणार आहोत.
आंबट फळं ही आम्लयुक्त असतात. दुपारच्या जेवणानंतर आंबट फळांचं सेवन केल्याने काही लोकांना अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.
तसेच, यामुळे अस्वस्थता, अपचन किंवा छातीत जळजळ होऊ शकते. त्यामुळे ज्यांना अॅसिडीटीचा त्रास आहे त्यांनी या फळांचं सेवन करू नये.
जेवणानंतर या आंबट फळांचं सेवन केल्याने काही अंशी शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता जाणवते. तसेच, यामुळे शरीरातील आवश्यक खनिजे आणि व्हिटॅमिन्सची कमतरता शरीरात भासते.
काही व्यक्तींना जेवणानंतर आंबट फळ खाल्ल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल प्रॉब्लेम्स जसे की, पोटात दुखणे, सूज येणे किंवा गॅसची समस्या उद्भवते.
तुम्हाला जर यापैकी कोणत्याही समस्या असतील तर आंबट फळांचं सेवन करू नये.