Monika Lonkar –Kumbhar
आपले केस लांब आणि घनदाट असावेत, असे सगळ्या महिलांना वाटते.
सध्याची बिघडलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या आहारामुळे केसगळती वाढली आहे.
केसांचे आरोग्य उत्तम प्रकारे राखण्यासाठी संतुलित आहार महत्वाचा आहे.
केसांच्या मजबूतीसाठी आणि वाढीसाठी तुम्ही फळांची मदत घेऊ शकता. कोणती आहेत ही फळे? जाणून घेऊयात.
आवळ्याचे नियमित सेवन केल्याने केसांना आतून पोषण मिळते आणि केस मजबूत होतात.
केसाच्या वाढीसाठी, मजबूतीसाठी व्हिटॅमिन सी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे, किवीचे सेवन अवश्य करा.
केळीचे सेवन केल्याने केसांची मजबूती आणि चमक वाढण्यास मदत होते.