केसांना कंडिशनर लावताना ‘या’ गोष्टींची घ्या खास काळजी

Monika Lonkar –Kumbhar

पावसाळा

सध्या अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे वातावरणात आर्द्रता निर्माण झाली आहे. त्यामुळे, आरोग्याची अन् केसांची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

हेअर केअर रूटीन

पावसाळ्यातील हेअर केअर रूटीनमध्ये कंडिशनरचा समावेश जरूर करा. केसांना कंडिशनर लावल्याने केस मऊ होण्यास मदत होते.

केसगळती

तुम्ही योग्य पद्धतीने केसांवर कंडिशनरचा वापर केला नाही तर तुमचे केस मोठ्या प्रमाणात गळू शकतात. 

स्काल्पला (टाळू) कंडिशनर लावू नका

अनेक जण केसांना कंडिशनर लावताना ते स्काल्पला (टाळूला) ही लावतात. जर तुम्ही ही चूक करत असाल तर ती दुरूस्त करा. 

केसांचा प्रकार लक्षात घ्या

केसांना कंडिशनर लावताना तुमच्या केसांचा प्रकार काय आहे? ते आधी लक्षात घ्या. तुमचे केस जर तेलकट किंवा कोरडे असतील तर त्यानुसार केसांना सूट होणारे कंडिशनर लावा.

केसांच्या लांबीनुसार कंडिशनर लावा

तुमचे केस जितके आहेत, अगदी त्याच हिशोबाने तुम्ही केसांना कंडिशनर लावायला हवे. 

चुकूनही केसांना जास्त कंडिशनर लावू नका. जर तुम्ही केसांना जास्त कंडिशनर लावले तर केस निस्तेज आणि खराब होतात. 

पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या आरोग्याची काळजी

Monsoon Healthy Food | esakal
येथे क्लिक करा.