वयाच्या 25 व्या वर्षी केस का पांढरे होऊ लागतात? जाणून घ्या

Aishwarya Musale

केसांत कोंडा

केसांशी संबंधित समस्यांचं प्रमाणही हळूहळू वाढत चाललं आहे. काहींच्या केसांत कोंडा होतो तर काहींचे केस सतत तुटतात. पण, आपल्यापैकी अनेकजण अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येने त्रस्त आहेत.

मुलांमध्येही ही समस्या दिसून येतेय. लहान वयात केस पांढरे झाल्याने फक्त लूकच खराब होत नाही तर आपला आत्मविश्वासही कमी होतो. केस पांढरे होण्याच्या भीतीने अनेकजण केसांना मेहंदी आणि कलर लावणं पसंत करतात. 

पण, जर तुमचे केस 20 ते 25 व्या वर्षीच पांढरे होऊ लागले तर ही खरोखरच त्रासदायक गोष्ट आहे.

हार्मोनल असंतुलन

शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे केसांवरही परिणाम होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे तुमच्या केसांचा पोत खराब होतो किंवा ते पांढरे देखील होऊ शकतात.

अनुवांशिक कारणे

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मधुमेहाप्रमाणे केसांची समस्या देखील अनुवांशिक असू शकते. .

ही सुद्धा कारणे आहेत

अति ताण घेणे, केमिकल हेअर प्रोडक्ट्स, धूम्रपानाची सवय, सूर्यप्रकाशाच्या दीर्घकाळ संपर्कामुळे केसांचे नुकसान होते.

काही वेळा शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची पातळी कमी होते, त्यामुळे केस पांढरे होतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केस निरोगी आणि काळे ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 असलेले पदार्थ खा.

तुमच्या आहारात अंडी, एवोकॅडो, फ्लेक्ससीड्स आणि भोपळ्याच्या बियांचा वापर करा. यासाठीच केसांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, कमी वयात जर तुमचे केस लवकर पांढरे होत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 

या पदार्थांमध्ये असतं दुधापेक्षा जास्त कॅल्शियम...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा