Monika Lonkar –Kumbhar
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे केसांच्य अनेक समस्या निर्माण होतात.
मग, या समस्या दूर करण्यासाठी हेअरकेअर प्रॉडक्ट्सची मदत घेतली जाते.
परंतु, केमिकल प्रॉडक्ट्समुळे ही केसगळती आणि केस तुटण्याची समस्या कमी होत नाही. अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
केसगळती रोखण्यासाठी रोज रात्री झोपताना केसांना तेल लावा.
मोकळ्या केसांमुळे केस तुटण्याची शक्यता वाढते. त्यामुळे, झोपण्यापूर्वी तुमच्या केसांची वेणी घाला.
ओल्या केसांमध्ये झोपणे चुकीचे आहे. यामुळे, केस तुटू शकतात आणि डोक्यात बुरशीजन्य बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा ही धोका वाढतो.
सूती कापडाची किंवा कॉटनची उशी केसांचा ओलावा कमी करू शकते. या उशीवर झोपल्यामुळे केस जास्त प्रमाणात घासले जातात.