Aishwarya Musale
आयुष्यात वाढलेल्या ताण, औषधे आणि हार्मोनल असंतुलन यामुळे केस गळतीची समस्या निर्माण होते. त्याच सोबतच असंतुलित आहार आणि काही वाईट सवयी देखील केस गळतीचे कारण बनू शकतात. महिलांना लांब केस आवडतात.
पण आजचे धकाधकीचे जीवन आणि वाईट जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होत आहे. त्यामुळे त्वचाच नाही तर केसही खराब होत आहेत. आपल्या केसांचा आपल्या सौंदर्यामध्ये खूप मोठा वाट असतो.
तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही आयुष्यात काही बदल केलेत तर तुमची केस गळतीची समस्या कमी होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला सुंदर लांब सडक केस हवे असतील तर तुमच्या काही सवयी आजच बदला.
जास्त साखर आरोग्यासाठी तसेच केसांसाठीही हानिकारक आहे. मधुमेह आणि लठ्ठपणाला कारणीभूत ठरणारी साखर देखील केसगळतीचे कारण असल्याचे काही अभ्यासात सिद्ध झाले आहे. जास्त साखर, स्टार्च आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्समुळे केस गळती होऊ शकते.
केसांमध्ये केराटीन प्रोटीन असते, ज्यामुळे केसांची रचना योग्य राहते. अल्कोहोलचे सेवन केल्याने प्रथिनांच्या निर्मितीवर परिणाम होतो. ज्यामध्ये केराटीन देखील समाविष्ट आहे. अतिरिक्त अल्कोहोलमुळे, केराटीन प्रोटीनचे प्रमाण देखील कमी होते.
केस जास्त प्रमाणात गळत असतील तर प्रक्रिया केलेले अन्न खाणे बंद करा. या अन्नामध्ये मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शक्यतो ताजी फळे आणि भाज्या खा. यामुळे केस गळणे थांबतात.
दुधात कॅसिन असते हे केसांच्या मुळांना कोरडे आणि पातळ बनवते. दही आणि चीजमध्ये देखील समान प्रोटीन असते. केस गळत असतील तर काही काळ दुग्धजन्य पदार्थ खाणे बंद करा.
तळलेल्या अन्नामध्ये ट्रान्स फॅट असते. हे केसांच्या मुळांना कमकुवत करते, ज्यामुळे केस गळतात. तळलेले अन्न आठवड्यातून एकदाच खा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.