Monika Lonkar –Kumbhar
केस निरोगी ठेवण्यासाठी केसांची योग्य प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. या समस्या दूर करण्यासाठी शॅंम्पू, हेअर सीरमसोबत अनेक घरगुती उपाय केले जातात.
केसांची बाहेरून काळजी घेण्यासोबत त्यांना आतून पोषण मिळण्यासाठी संतुलित आहार महत्वाचा आहे.
केसांच्या पेशी हा शरीराचा सर्वात वेगाने वाढणारा भाग आहे. त्यासाठी व्हिटॅमिन ए अतिशय फायदेशीर आहे.
केसांची गळती रोखण्यासाठी व्हिटॅमिन सी अतिशय लाभदायी आहे. त्यामुळे, तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी युक्त खाद्यपदार्थांचा समावेश करा.
केसांची गळती रोखण्यासाठी आणि केसांच्या पोषणासाठी व्हिटॅमीन डी फायदेशीर आहे.
'व्हिटॅमिन ई' च्या कमतरतेमुळे तुमचे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात. कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी व्हिटॅमिन ई चा आहारात जरूर समावेश करा.