केस तुटणे अन् गळणे होईल कमी, फक्त झोपण्यापूर्वी केसांसाठी एवढंच करा

Monika Lonkar –Kumbhar

केसांच्या समस्या

बिघडलेली जीवनशैली, वाढते प्रदूषण आणि धूळ इत्यादी कारणांमुळे केसांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.

केसगळती

वारंवार होणारी केसगळती आणि केस तुटण्याच्या समस्येमुळे केस खराब होतात.

केसांची काळजी

केसगळती आणि केस तुटण्याची समस्या दूर करण्यासाठी झोपताना केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

केसांची वेणी

झोपण्यापूर्वी तुमच्या केसांची वेणी घाला. परंतु, वेणी घालताना ती जास्त घट्ट घालू नका. 

ओल्या केसांमध्ये झोपू नका

ओल्या केसांमध्ये झोपणे हे चुकीचे आहे. यामुळे, केस तुटू शकतात आणि डोक्यात बुरशीजन्य बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा ही धोका वाढतो.

कॉटनच्या उशीला करा बाय-बाय

सूती कापडाची किंवा कॉटनची उशीवर झोपल्यामुळे केस जास्त प्रमाणात घासले जातात. यामुळे केस तुटण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

केसांना तेल लावा

झोपताना केसांना तेल लावून झोपल्यामुळे केसांच्या मुळांमध्ये तेल छान मुरते आणि झोप ही छान लागते.

लांब अन् दाट केसांसाठी आहारात समाविष्ट करा 'हे' पदार्थ

Hair Care tips | esakal
येथे क्लिक करा.