Hair Care : सुंदर अन् चमकदार केसांसाठी आवळ्याचा असा करा वापर

साक्षी राऊत

आवळा आणि मेहंदी

आवळा आणि मेहंदी केसांवर औषधाप्रमाणे काम करते. चला तर आवळा आणि मेहेंदी पावडर मिक्स करून लावण्याचे फायदे जाणून घेऊया.

Hair Care

केस जाड होतात

मेहंदी आणि आवळा पावडर दोघांमध्येही अँटीफंगल,अँटीबॅक्टेरीयल आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त गुणधर्म असतात. या दोघांचे मिश्रण केसांना लावल्याने केसांची थिकनेस वाढते.

Hair Care

स्काल्प इंफेक्शनपासून बचाव

आवळा आणि मेहंदी पावडर केसांवर लावल्याने स्काल्प इंफेक्शनचा धोका कमी होतो. या मिश्रणाने स्काल्पची ph लेव्हल बॅलेंस्ड राहाते आणि आरोग्य चांगलं राहातं.

Hair Care

केसांचं अतिरिक्त तेल कमी होते

स्काल्प वाढल्याने काही लोकांना त्याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. तेव्हा अशा वेळी हे मिश्रण लावल्याने फायदा होतो.

Hair Care

केस झपाट्याने वाढतात

आवळा आणि मेहंदी दोन्हींमध्ये अनेक पोषक तत्व असतात. जे केसगळती कमी करते आणि केसांना मजबूत बनवते. लांब केसांसाठी तुम्ही या मिश्रणाचा वापर करू शकता.

Hair Care

पांढऱ्या केसांवरही फायदेशीर

आवळा आणि मेहंदी एकप्रकारे नॅचरल डाय आहे. जे केस काळे करण्यास मदत करते. तेव्हा पांढऱ्या केसांच्या समस्येसाठीही तुम्ही या मिश्रणाचा वापर करू शकता.

Hair Care

हे मिश्रण कसं लावायचं?

आवळा आणि मेहंदी पावडरला कोमट पाण्यात मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टला हेअर मास्कसारखं डोक्याला लावा. दोन तास हे मिश्रण डोक्याला लावून ठेवा. २ तासानंत कुठल्याही माइल्ड शाम्पूच्या मदतीने केस धुवून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Care