धनश्री भावसार-बगाडे
व्यक्तीचं हस्ताक्षर त्यांच्या स्वभावाविषयी बरच काही सांगत असतो. यामुळे एखाद्या माणसाला समजणे सोपे होते.
जे लोक शब्दांच्या मध्ये जास्त अंतर ठेवतात, त्यांना स्वातंत्र्य आवडतं. तर जे कमी स्पेस ठेवतात त्यांना लोकांसोबत रहायला आवडतं.
सोशल लोकांचं अक्षर मोठं असतं. तर लाजाळू आणि इंट्रोवर्ट लोक लहान अक्षरांत लिहितात. तर मध्यम आकाराचं अक्षर असलेले लोक मजबूत आणि एकाग्र मनोवृत्तीचे लोक असतात.
लिहिताना पेनावर खूप दाब देऊन लिहिणे हे राग आणि टेंशनचं प्रतिक आहे. तर कमी प्रेशर टाकणारे लोक सहानुभूती असणारे संवेदनशील असतात.
जे लोक अक्षरं खूप जवळ जवळ काढून लिहितात ते लोक तर्काला फार महत्व देतात. याउलट जे खूप अंतर ठेवून लिहितात ते कल्पनाशील असतात.
तुमचे अक्षर कोणत्या दिशेने तिरपे आहे यावरही स्वभाव ठरतो. जर उजवीकडे तिरपं असेल तर नव्या लोकांना भेटणं, काम करणं आवडतं तर डावीकडे तिरपं असेल तर तुम्ही खुदपसंत आहात.
जर तुम्ही फार वेगात लिहित असाल तर शक्यता फार आहे की, तुम्ही निर्णयपण घाईत घेतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.