Swadesh Ghanekar
विराटने ११८ कसोटी सामन्यांत ४७.८३च्या सरासरीने ९०४० धावा केल्या आहेत. त्यात २९ शतकं व ३१ अर्धशतकांचा समावेश आहे.
वन डे क्रिकेटमध्ये विराटने २९५ सामन्यांत ५० शतकं व ७२ अर्धशतकांसह १३९०६ धावा केल्या आहेत.
१२५ ट्वेंटी-२० सामन्यांत विराटने ४१८८ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील या सर्वाधिक धावा आहेत.
विराट कोहलीने भारतीय संघाच्या विजयात मोठा वाटा उचलल्याची आकडेवारी समोर आली आहे.
भारतीय संघाच्या विजयात सर्वाधिक १७६६९ धावा या विराट कोहलीच्या नावावर आहेत
भारताच्या विजयात सर्वाधिक ८६ अर्धशतकं आणि सर्वाधिक ५६ शतकं ही विराटने झळकावली आहे.
विराट कोहलीने भारतीय संघाला विजय मिळवून देताना सर्वाधिक ६ द्विशतकं झळकावली आहेत.
विराट कोहलीने भारताला विजय मिळवून देताना सर्वाधिक ६३ सामनावीर पुरस्कार जिंकली आहेत.
विराट कोहली हा सर्वाधिक १५ मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.