रोहित कणसे
भारतीय संघाने टी २० वर्ल्डकप जिंकला त्यामध्ये ऑलराउंडर हार्दिक पांड्याचे योगदान मोलाचे ठरलं.
वर्ल्डकप स्पर्धेनंतर आयसीसीने ताजी टी२० क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने दमदार कामगिरी केलीय.
हार्दिकने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.
हार्दिक पुरुषांच्या टी२० क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावणारा पहिलाच भारतीय ठरला आहे.
हार्दिक पांड्याने या टी२० वर्ल्डकपमध्ये ११४ धावा केल्या आहेत यामध्ये त्याची सरासरी ४८ इतकी तर स्ट्राइक रेट १५१ इतकं होतं.
गोलंदाजीत देखील पांड्याने चांगली कामगिरी केलीय, त्याने स्पर्देत ११ विकेट्स देखील घेतल्या आहेत.
विशेष म्हणजे पांड्याने स्पर्धेच्या फायनलमध्ये २० धावा देऊन तीन विकेट्स नावावर केल्या.
आयसीसी रॅकिंगमध्ये दोन स्थानांनी बढती घेत हार्दिकने पहिला क्रमांक मिळवला आहे, त्यासोबत श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा देखील पहिल्या क्रमांकावर आहे.
'आश्रम'मधली बबिता सोशल मीडियात व्हायरल