हार्दिक पांड्याला लागणार 'सूर्य'ग्रहण!

Kiran Mahanavar

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-20 क्रिकेटला अलविदा केला आहे. आता सर्वांना जाणून घ्यायचे आहे की भारताचा पुढचा कर्णधार कोण असेल?

अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या टीम इंडियाचे कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आले होते.

Hardik Pandya

आता भारताचा श्रीलंका दौरा २७ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यासाठी संघाची घोषणा कधीही होऊ शकते. हार्दिक पांड्याला कर्णधारपद मिळणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही.

Hardik Pandya

खरं तर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि निवड समितीला हार्दिक पांड्याची तंदुरूस्ती ही खूप मोठी चिंतेची गोष्ट आहे. 

वैयक्तिक कारणांमुळे पांड्या ऑगस्टमध्ये होणारी तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार नाही.

आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी हार्दिककडे टी-२० संघाचे नेतृत्व जाईल अशी शक्यता जास्त आहे.

Hardik Pandya

पण बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सूर्यकुमार यादव भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ उमेदवार म्हणून समोर आला आहे.

सुर्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेदरम्यान आणि एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेनंतरच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यादरम्यान संघाचे नेतृत्व केले होते.

BCCI अन् गंभीर टेन्शनमध्ये! पांड्या अचानक घेतली माघार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya To Miss ODI Series Vs Sri Lanka | sakal
येथे क्लिक करा