Pranali Kodre
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
हार्दिक पांड्याने नुकतेच जाहीर केले आहे की तो त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविकपासून वेगळा झाला आहे.
त्याने सांगितले की चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी आता वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
यादरम्यान, त्यानं असंही सांगितलं आहे की त्यांचा ४ वर्षांचा मुलगा अगस्त्य याचं सह-पालकत्व स्विकारलं आहे. त्यामुळे त्याचं पालनपोषण ते एकत्र मिळून करणार आहेत.
याचदरम्यान, हार्दिकचा अगस्त्यसोबतचा काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये हार्दिक छोट्या अगस्त्यबरोबर मस्ती करताना आणि खेळताना दिसत आहे.
हार्दिक अनेकदा अगस्त्यसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.