Pranali Kodre
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या मैदानातील कामगिरीबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे.
हार्दिकने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की तो त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविचपासून वेगळा झाला आहे.
पण असे असले तरी हार्दिकने असंही सांगितलं होतं की त्यांचा मुलगा अगस्त्य याचं त्यांनी सहपालकत्व स्विकारलं आहे.
दरम्यान नताशाने काही दिवसांपूर्वीच सार्बियामध्ये अगस्त्याबरोबर मस्ती करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यावर हार्दिकने कमेंटही केली होती, ज्याची बरीच चर्चाही झाली.
आता ३० जुलै रोजी अगस्त्यचा चौथा वाढदिवस साजरा झाला. याचनिमित्ताने हार्दिकने त्याच्याबरोबर खेळतानाचा एक क्युट व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये हार्दिक लेकाबरोबर मस्ती करताना आणि खेळताना दिसत आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हार्दिकने लिहिलंय 'प्रत्येक दिवस तुझ्यामुळे मला प्रेरणा मिळते. माझा पार्टनर इन क्राइम, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला खूप प्रेम.'