Pranali Kodre
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या बांगलादेशविरुद्ध ६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी२० मालिकेपूर्वी बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये ट्रेनिंग करत आहे.
टी२० मालिकेतून हार्दिक जुलैनंतर पहिल्यांदाच बांगलादेशविरुद्धच्या टी२० मालिकेतून भारताकडून खेळणार आहे. त्यामुळे सध्या त्याची जोरदार तयारी सुरू आहे.
यादरम्यान, त्याच्याबरोबर सध्या त्याचा मुलगा अगस्त्य देखील आहे.
हार्दिकने ट्रेनिंगवेळी अगस्त्यही बरोबर असतानाचे फोटो शेअर केले आहेत.
हार्दिकने या फोटोंच्या पोस्टला कॅप्शन दिले आहे की 'माझी सर्वात मोठी प्रेरणा'.
हार्दिक आणि नताशा स्टॅन्कोविच यांनी काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट घेतला आहे. पण ते अगस्त्याचे सहपालकत्व स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितलं होते.
दरम्यान, वेगळे झाल्याचं घोषित केल्यानंतर काही दिवस अगस्त्य नताशासोबत होता. त्यानंतर आता काहीदिवसांपूर्वीच तो हार्दिकला भेटला आहे.