Anuradha Vipat
अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न करण्यापूर्वी विकी कौशल हा हरलीन सेठीला डेट करत होता.
मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हरलीन विकीविषयी व्यक्त झाली.
तसेच हरलीनने तिचं रिलेशनशिप स्टेटस सध्या ‘सिंगल’ असल्याचं सांगत ‘मिस्टर राइट’ची म्हणजेच योग्य व्यक्तीची प्रतीक्षा करत असल्याचं म्हटल आहे
या मुलाखतीत हरलीन तिच्या आयुष्याबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाली.
हरलीन म्हणाली, आयुष्यात मी सध्या ज्या ठिकाणी आहे, तिथे खुश आहे. मी अजूनही खास व्यक्तीची वाट पाहत आहे
पुढे हरलीन म्हणाली, मला हरलीन सेठी याच नावाने ओळखलं गेलेलं आवडेल. एखाद्याला एखाद्याची एक्स गर्लफ्रेंड किंवा एखाद्याचा एक्स बॉयफ्रेंड म्हणणं चुकीचं असेल. मी कोणाचीच एक्स, आताची किंवा भविष्याची गर्लफ्रेंड नाही, मी हरलीन सेठी आहे.