Pranali Kodre
इंग्लंडने २४ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार ( DLS) ४६ धावांनी जिंकला.
इंग्लंडच्या या विजयात प्रभारी कर्णधार हॅरी ब्रुकने शतकी खेळी केली होती. यासह त्याने एक विक्रमही केला आहे.
ब्रुकने ९४ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह ११० धावांची खेळी केली.
ब्रुकने ही शतकी खेळी केली तेव्हा त्याचे वय २५ वर्षे २१५ दिवस इतके होते.
त्यामुळे ब्रुक इंग्लंडसाठी वनडेत शतक करणारा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. ब्रुकने ऍलिस्टर कूकचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
कूकने २०११ मध्ये श्रीलंकेविरुद्ध नेतृत्व करताना २६ वर्षे १९० दिवस वय असताना पहिल्यांदा वनडेत शतक केले होते.
त्यापाठोपाठ ओएन मॉर्गन आहे. २०१३ मध्ये आयर्लंडविरुद्ध इंग्लंडचे नेतृत्व करताना मॉर्गनने २६ वर्षे ३५८ दिवस वय असताना पहिल्यांदा शतक केले होते.