Pranali Kodre
इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरी केन याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
इंग्लंड-फिनलंड यांच्यामध्ये १० सप्टेंबर रोजी नेशन्स लीग या फुटबॉल स्पर्धेतील लढत खेळवण्यात येणार आहे. ही लढत हॅरी केनच्या कारकिर्दीतील १००वी लढत असणार आहे.
देशासाठी १०० लढत खेळणारा तो इंग्लंडचा दहावा खेळाडू ठरणार आहे.
१०० व्या सामन्याचे औचित्य साधून हॅरी केन याला सोनेरी कॅप प्रदान करण्यात येणार आहे.
हॅरी केनच्या आधी वेन रूनी याने इंग्लंडसाठी १०० सामने खेळण्याचा मान संपादन केला होता. रुनी याने २०१४ मध्ये हा सामना खेळला होता.
हॅरी केन याने इंग्लंडसाठी खेळताना आतापर्यंत ६६ गोल केले आहेत. यामध्ये आणखी भर टाकण्यासाठी हॅरी केन सज्ज झाला असेल.
फिनलंड देशाविरुद्ध तो कर्णधार म्हणून ७३ व्यांदा मैदानात उतरणार आहे.
३१ वर्षीय हॅरी केन सर्वाधिक २८ फायनल्समध्ये सहभागी झाला आहे.