Pranali Kodre
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
तिसऱ्या कसोटीला १ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघात बीसीसीआयच्या निवड समितीने मोठा बदल केला आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी गोलंदाजीची फळी मजबूत करण्यासाठ दिल्लीचा जलदगती गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) याला भारतीय संघात स्थान दिले आहे.
त्यामुळे हर्षितला आता मुंबईमध्ये कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. त्याला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही भारतीय कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.
हर्षितची प्रथम श्रेणीमधील जबरदस्त कामगिरी राहिली आहे. हर्षितने आत्तापर्यंत १० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्याने यामध्ये २४ च्या सरासरीने ४३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने एका शतकासह ४६९ धावाही केल्या आहेत.
त्याने १४ लिस्ट ए सामने खेळले असून २२ विकेट्स घेतल्या आहेत, तर ६८ धावा केल्या आहेत.
हर्षितने २५ टी२० सामने खेळले आहेत, ज्यात त्याने २८ विकेट्स घेतल्या आहेत. धावा मात्र दोनच केल्या आहेत.
हर्षितने खेळलेल्या २५ टी२० सामन्यांपैकी २१ सामने त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळले असून त्यात त्याने २५ विकेट्स घेतल्या आहेत.