तुमचा विकेंड मस्त जाईल! 'या' जुन्या कॉमेडी फिल्म्स पाहा

Amit Ujagare (अमित उजागरे)

गोलमाल

ही एका व्यक्तीची गोष्ट आहे जो आपला जॉब टिकवण्यासाठी दोघे जुळे भाऊ असल्याचं नाटक करत असतो. पण नंतर तो स्वतःच्या खोट्यातच अडकतो.

Golmaal

चुपके चुपके

धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा आहे. यात नवं लग्न झालेली व्यक्ती बायकोच्या नातेवाईकांना खुद्द बायको आणि मित्राच्या मदतीनं खोड्या काढत असतो.

Chup Chup Ke

छोटी सी बात

हा सिनेमा एका लाजाळू व्यक्तीवर आधारित रोमँटिक कॉमेडी असून आपल्या क्रशचं मन जिंकण्यासाठी एका लव्हगुरुकडून धडे घेत असतो.

Chhoti Si Baat

जाने भी दो यारो

हा सिनेमा दोन फोटोग्राफर्सची कहानी असून हे दोघेही अपघातानं एका खून प्रकरणाचे फोटो काढतात आणि त्यानंतर यातील भ्रष्टाचार उघड करण्यात गुंतून जातात.

Jaane Bhi Do Yaaro

पडोसन

हा सिनेमा एक क्लासिक सिनेमा मानला जातो. घरासमोर राहणाऱ्या तरुणीवर प्रेम करणाऱ्या तरुणानं आपल्या गायक मित्राच्या मदतीनं तिला आपलंस करण्यासाठीची त्याची धडपड यात पहायला मिळते.

Padosan

बॉम्बे टू गोवा

हा सिनेमा मल्टिस्टारर सिनेमा असून मुंबई ते गोवा बस प्रवासात घडणाऱ्या विविध रंजक घडामोडींवर आधारित हा सिनेमा आहे. याच सिनेमाच्या धर्तीवर मराठीत 'नवरा माझा नवसाचा' हा सिनेमा तयार करण्यात आला.

Bombay To Goa

सीता और गीता

दोन जुळ्या बहिणींची ही कहानी असून यात प्रमुख भूमिका हेमा मालिनी यांनी साकारली आहे. त्या जन्मापासूनच वेगळ्या झालेल्या असतात पण त्या दोघींची जडणघडण भिन्न सामाजिक पातळीवर झालेली असते.

Seeta Aur Geeta

मनचली

हा एक रोमॅन्टिक कॉमेडी ड्रामा असून संजीव कुमारनं यात उत्तम भूमिका साकारली आहे. एका श्रीमंत मुलीची ही गोष्ट असून तिला लग्न करायचं नसतं त्यामुळं ती नवरा भाडे तत्वावर घेते, अशी याची कथा आहे.

Manchali

नितळ सौंदर्य! नाकात नथ, मोकळे केस अन् चाहत्यांचे उडाले होश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shruti Marathe
येथे क्लिक करा...