Anuradha Vipat
अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे.
सोनमने दिवाळीनिमित्त हटके ड्रेसमधील फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सोनमने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंना कॅप्शन देताना सोनमने म्हटले, “हे आऊटफीट कर्नाटकमधील लाल आणि मुलतानी मातीपासून बनवलेला आहे. त्याबरोबरच लेहेंगा आणि ओढणी ही खादीची आहे.
तसेच या पोशाखाचे महत्त्व खूप आहे. या दिवाळीला आपल्या परंपरा आणि मूळांशी अशा प्रकारे स्वत:ला जोडता आले, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे असे म्हणत सोनमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अनेकांनी सोनमच्या या हटके लूक आणि पोशाखाचे कौतुक केले आहे.
सोनम तिचे वक्तव्य आणि सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत असते.