Amit Ujagare (अमित उजागरे)
गौतम गंभीरची अखेर टीम इंडियाच्या हेडकोचपदी नियुक्ती झाल्याची घोषणा बीसीसीआयनं केली आहे.
गेल्या अनेक काळापासून गंभीरच्या हेडकोचपदी नियुक्तीच्या चर्चा सुरु होत्या.
पण पगाराच्या मुद्द्यावरुन गंभीरच्या नियुक्तीची घोषणा होण्यासाठी बराच काळ गेला.
आता पगारावर सहमती झाल्यानंतरच बीसीसीआयनं गौतम गंभीरची हेडकोचपदी नियुक्ती झाल्याचं जाहीर केलं आहे.
बीसीसीआयनं हेडकोचसाठी जेव्हा अर्ज मागवले होते तेव्हाच जाहिरातीत पगाराबाबत उल्लेख केला होता.
या पदासाठी जसा अनुभवसंपन्न खेळाडू असेल तसा पगार दिला जाईल असं यात स्पष्ट म्हटलं होतं.
पण राहुल द्रविड पेक्षा जास्त पगार गौतम गंभीरला मिळेल असं बोललं जात होतं. द्रविडला वर्षाला १२ कोटी रुपये पगार मिळत होता.
त्यामुळं सहाजिकच गौतम गंभीरला १२ कोटींहून अधिक पगार मिळाल्यावरच सहमती झाल्याचं सांगितलं जात आहे.