Saisimran Ghashi
सतत डोकेदुखी आणि थकवा यासाठी आजीच्या बटव्यात काही सोपे घरगुती उपाय आहेत.
आलं एक उत्तम प्राकृतिक उपाय आहे. आल्याचा एक छोटा तुकडा उकळून त्याचा रस घेणं किंवा त्यात मध घालून पिणं, डोकेदुखी कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतं.
तुळशीच्या पानांची चहा किंवा काढा बनवून पिणं, थकवा आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी मदत करू शकतो.
जास्त पाणी पिण्यामुळे शरीरातील डीहायड्रेशन कमी होऊ शकतं, जे डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरू शकतं.
खोबरेल तेल किंवा मेंथोल तेल डोक्यावर हलक्या हाताने लावून मसाज करा. यामुळे आराम मिळू शकतो.
काही श्वासप्रश्वास साधनं आणि साधे योगासने तुमच्या शरीराला ऊर्जा देईल.
जर तुम्हाला सतत डोकेदुखी आणि थकवा जाणवत असेल तर या सोप्या उपायांचा उपयोग करून बघा, परंतु ते खूप दीर्घकाळ सुरू राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही यांची पुष्टी करत नाही.