Aishwarya Musale
सध्याच्या काळात अनेकांची डोकेदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दररोज स्क्रिन समोर असणं, मोबाईलचा अतिवापर, बदलते हवामान, पावसात भिजल्यामुळे अशा अनेक कारणांमुळे डोकेदुखीची समस्या वाढत आहे.
डोकेदुखीमुळे लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. त्यामुळे डोकेदुखीचा हा त्रास कमी करण्यासाठी लोक अनेक वेगवेगळे उपाय करत असतात.
तसंच बहुतेक लोक हे डोकेदुखी थांबण्यासाठी घरगुती उपाय करायचं बगतात. तर आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत जे डोकेदुखी थांबण्यास मदत करतील.
जेव्हा तुमचं डोकं खूप जास्त दुखत असेल तर अशावेळी थंड पाण्याने अंघोळ करा. अंघोळ केल्यानंतर तुमचे कपडेही बदला. यामुळे तुम्हाला फ्रेश राहण्यास मदत होईल.
तुमच्या आवडीचं हेअर ऑइल घ्या आणि ते थोडं गरम करून घ्या. या हेअर ऑइलने तुमच्या डोक्यात हलक्या हातांनी मसाज करुन घ्या किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून तेलाने मसाज करुन घ्या.
ज्यावेळी महिला त्यांच्या केसांना तेल लावतील त्यावेळी केस घट्ट बांधू नये. सोबतच डोकं दुखत असेल त्यावेळेस विश्रांती आवर्जून घ्या आणि फोनचा जास्त वापर करू नका.
ज्यावेळेस डोकं खूप दुखत असेल त्यावेळी तुळस आणि मधाचं पेय घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.