केळीचा चहा पिण्याचे फायदे; पचन अन् हाडासांठी फायदेशीर

सकाळ डिजिटल टीम

या चहाबद्दल आपल्याला फारसे माहिती नसेल मात्र हा चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.

केळीच्या सालींसह केळीला पाण्यात गरम करा. उकळलेले हे पाणी नंतर ब्लॅक किंवा दूधाच्या चहात मिसळा.

केळीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे पचनक्रियेला वेळ लागतो. यामुळे जास्त काळ भूक लागत नाही आणि वजन घटण्यास मदत होते.

केळी मॅगनीज आणि मॅग्नेशिअमने परिपूर्ण असते. यामध्ये असणारी पोषक तत्त्वे हाडांची ताकद वाढवण्यासाठी मदत करतात.

केळीत असणारे पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम शरीरातील पचनक्रिया वाढण्यासाठी मदत करतात. काही सूज असेल तर कमी करण्यास मदत करतात.

यात असणारे पोटॅशिअम नसामध्ये असणारा दबाव संतुलित करतात आणि शरीरातील ब्लडप्रेशर नियंत्रित करण्याचे काम करतात.

केळामध्ये असणारे अॅंटीऑक्सिडंट व्हिटॅमीन ए आणि सी हे शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

केळीच्या चहामध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिन असते. हे घटक डोक्यातील तणावापासून दूर ठेवण्यास मदत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.