Monika Lonkar –Kumbhar
सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी दररोज योगासने आणि प्राणायाम करण्याचा सल्ला दिला जातो.
योगातज्ज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते नियमितपणे भ्रामरी प्राणायाम करणे हे लोकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
या भ्रामरी प्राणायामला 'हमिंग बी ब्रीदिंग टेक्निक' असे ही म्हटले जाते.
हा प्राणायाम नियमित केल्याने राग शांत होतो आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
ताण-तणाव दूर करण्यासाठी हा सर्वात सोपा आणि फायदेशीर प्राणायाम आहे.
या भ्रामरी प्राणायामचा नियमित सराव केल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
दररोज भ्रामरी प्राणायाम केल्याने शांत झोप लागते. ज्या लोकांना झोपेची समस्या आहे, अशा लोकांनी या प्राणायामचा न चुकता सराव करावा.