ब्लॅक-टी पिण्याने आरोग्याला होणारे हे ७ फायदे

सकाळ डिजिटल टीम

ब्लॅक-टी

चहा हे आपल्या भारतीयांचे सर्वात आवडते पेय आहे. साधारणत: सर्वांचीच सकाळ चहा प्यायल्याशिवाय सुरू होत नाही. आपल्यापैकी बहुतेकांना दुधाचा चहा आवडतो, जो चवीला चवदार पण आरोग्यासाठी हानिकारक आहे. अशा परिस्थितीत दुधाच्या चहाच्या ऐवजी ब्लॅक-टी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊयात ब्लॅक-टी पिण्याचे हे ७ फायदे.

tea | esakal

निरोगी आरोग्य

काळा चहा प्यायल्याने शरीराला टॅनिन, फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक मिळतात. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

tea | esakal

हृदयाचे आरोग्य

ब्लॅक टी पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट असतात जे हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात. यामुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

tea | esakal

पचनक्रिया सुधारते

ब्लॅक टी प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे पचनक्रिया सुधारतात, पोटाचे स्नायू सक्रिय करतात आणि आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढवतात. यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

tea | esakal

वजन कमी होते

ब्लॅक टीमुळे पचनक्रिया गतिमान झाल्याने चरबी कमी करण्यास मदत होते आणि त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेस प्रोत्साहन मिळते.

tea | esakal

रोगांपासून रक्षण

काळ्या चहामध्ये अँटिऑक्सिडेंट असल्याने रोग आणि संक्रमणाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

tea | esakal

तरुण त्वचा

ब्लॅक टी तुमच्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात आणि त्वचेला दिर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करतात .

tea | esakal

मधुमेहापासून मुक्तता

मधुमेहाच्या रूग्णांनाही ब्लॅक टीचा फायदा होऊ शकतो, त्यात अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरीचा प्रभाव असतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

tea | esakal

वजन वाढाची नेमकी कारणे काय ?

weight gain reasons | esakal
येथे क्लिक करा