गाजराचा ज्यूस आरोग्यासाठी आहे लाभदायी, जाणून घ्या 'हे' फायदे

Monika Lonkar –Kumbhar

गाजर

गाजरामध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. व्हिटॅमिन A ने समृद्ध असलेल्या गाजरामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. 

Carrot Benefits

गाजराचा ज्यूस

गाजराचा ज्यूस हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पोषकतत्वांनी समृद्ध असलेला गाजराचा रस पिऊन अनेक जण त्यांच्या दिवसाची सुरूवात करतात. 

Carrot Benefits

वजन कमी होते

गाजरामध्ये कमी कॅलरीज देखील आढळून येतात, त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी गाजराचा ज्यूस पिणे हे फायदेशीर आहे. हा ज्यूस पिल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते.

Carrot Benefits

डोळ्यांसाठी फायदेशीर आहे गाजर

गाजरामध्ये व्हिटॅमिन A आणि बीटा कॅरोटिनचे मुबलक प्रमाण आढळून येते. त्यामुळे, गाजराचा ज्यूस पिल्याने आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. शिवाय, डोळ्यांशी निगडीत इतर समस्या दूर होण्यास देखील मदत होते.

Carrot Benefits

ज्यांना डोळ्यांच्या समस्या आहेत, अशा लोकांनी गाजराचे सेवन अवश्य करावे आणि गाजराचा ज्यूस देखील प्यावा.

Carrot Benefits

रोगप्रतिकारक शक्ती होते मजबूत

गाजरामध्ये व्हिटॅमिन्स आणि फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, गाजराचा ज्यूस पिल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

Carrot Benefits

गाजरामध्ये व्हिटॅमिन सी, आणि ए चे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, संक्रमित आजारांशी लढण्यासाठी गाजर मदत करते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

Carrot Benefits

हिवाळ्यातील सुपरफूड आहे ब्रोकोली, जाणून घ्या फायदे

Benefits of Broccoli | esakal
येथे क्लिक करा.