Monika Lonkar –Kumbhar
चिकू हे फळ बाहेरून जरी खडबडीत दिसत असले तरी ते आतून रसाळ आणि खायला गोड लागते.
चिकूमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि इतर पोषकतत्वांचा समावेश आढळून येतो.
पोषकतत्वांनी युक्त असलेले चिकू हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
चिकूमध्ये फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, चिकूचे सेवन केल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.
चिकूमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे, चिकूचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
चिकूमध्ये असलेले मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअममुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी चिकू हे फळ अतिशय फायदेशीर मानले जाते.