दालचिनी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Monika Lonkar –Kumbhar

दालचिनी

भारतीय स्वयंपाकघरात हमखास वापरला जाणारा मसाल म्हणजे दालचिनी होय. या दालचिनीच्या छोट्याशा तुकड्याने देखील खाद्यपदार्थांना कमाल चव मिळते.

Cinnamon Benefits

पुलाव, बिर्याणी, चिकन आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये दालचिनीचा आवर्जून वापर केला जातो. दालचिनीशिवाय बिर्याणी तर अपूर्णच आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

Cinnamon Benefits

दालचिनी हे सदाहरित वृक्षात मोडते. त्याच्या खोडाच्या सालीला दालचिनी असे म्हणतात. याच वृक्षाच्या वाळलेल्या पानांचा वापर तमालपत्र म्हणून केला जाते. मात्र, जेवणाव्यतिरिक्तही दालचिनी चे फायदे भरपूर आहेत. ते आपण जाणून घेऊयात.

Cinnamon Benefits

मधुमेहासाठी प्रभावी

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम दालचिनी करते. डायबिटीजमधील दुसऱ्या प्रकारातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनी फायदेशीर आहे.

Cinnamon Benefits

रक्तदाबासाठी लाभदायी

संशोधनानुसार, दालचिनीचे सेवन केल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते.

Cinnamon Benefits

हृदयविकार नियंत्रणात ठेवते

ह्रदयविकारावर दालचिनी अत्यंत गुणकारी आहे. दालचिनीमुळे तुमचा रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि ह्रदयविकार नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Cinnamon Benefits

कॅन्सरसाठी फायदेशीर

काही संशोधनात असे दिसून आले आहे की, दालचिनी देखील कर्करोगापासून संरक्षण करण्यास सक्षम आहे. हे कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करते.

Cinnamon Benefits

हिरव्या वेलवेट ड्रेसमध्ये प्रिया बापटचा 'ब्युटीफूल' अंदाज

Priya Bapat | esakal
येथे क्लिक करा.