रोज सकाळी प्या कढीपत्त्याचं पाणी, आरोग्याला होतील अनेक फायदे..

Aishwarya Musale

आपल्या स्वयंपाक घरातील काही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरतात. आरोग्यासाठी गुणकारी असा कढीपत्ता आपण फोडणीसाठी हमखास वापरतो, पण काहीजण याकडे दुर्लक्षही करतात.

तुम्हीही असं करत असाल, तर आजपासूनच कढीपत्त्याचा वापर करायला सुरुवात करा. पण, तुम्हाला माहीत आहे का? सकाळी रिकाम्यापोटी कढीपत्त्याचं पाणी पिण्याचे फायदे काय? चला जाणून घेऊया.

 मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स

कढीपत्त्याचं पाणी हा दिवसाची सुरुवात करण्याचा अत्यंत उत्तम आणि आरोग्यदायी मार्ग आहे. कढीपत्त्याचं पाणी शरीराला ऊर्जा देतं आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं.

केसांसाठी फायदेशीर

कढीपत्त्याचे गुणधर्म केसांसाठी टॉनिकचं काम करतात. केसांच्या वाढीसही कढीपत्ता फायदेशीर ठरतो. कमी वयातच तुमचे केस पांढरे होऊ लागले असतील, तर कढीपत्ता तुमची ही समस्या दूर करण्यास मदत करतो.

पचनक्रिया सुधारते

कढीपत्त्यामध्ये पचनक्रिया सुधारण्यासाठी आवश्यक असणारे घटक असतात. यामध्ये पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी आवश्यक असणारे, एंजाइम असतात जे आतड्यांसंबंधित समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. 

कढीपत्त्याचं पाणी प्यायल्यानं स्नायू आणि मज्जातंतूंना आराम मिळतो, तसेच यामुळे तणावापासून आराम मिळतो.

 कोलेस्ट्रॉल कमी

कढीपत्ता हे अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स आणि फिनोलिक कम्पाउंड यांसारख्या संरक्षणात्मक वनस्पती पदार्थांचं भंडार आहे. हे पदार्थ अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात, जे शरीरातील उच्च कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळीसारख्या समस्या कमी करून हृदय निरोगी ठेवू शकतात.

कढीपत्त्याचं पाणी तयार करणं अत्यंत सोपं आहे. त्यासाठी मुठभर कढीपत्त्याची पानं घ्या आणि गरम पाण्यात भिजत ठेवा. काही वेळ ठेवल्यानंतर हे पाणी गाळून घ्या. कढीपत्त्याचं पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच अनेक आजारांवर ‘करवंद’ गुणकारी!

येथे क्लिक करा