१० दिवस पाण्यात लवंग टाकून प्या, होतील आरोग्यदायी फायदे

सकाळ डिजिटल टीम

आपण जेवणामध्ये नेहमीच लवंग वापरतो. लवंग जेवणाचा स्वाद वाढवण्यासोबतच आरोग्यालाही फायदेशीर असते. त्यामुळे जर तुम्ही १० दिवस पाण्यात लवंग टाकून प्यायलात तर तुम्हाला पुढील प्रमाणे फायदे होऊ शकतात.

Clove water | esakal

लवंगाचे गुणधर्म

यामध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के, ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फोलेट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट हे गुणधर्म असतात.

Clove water | esakal

पचनक्रिया सुधारते

१० दिवस दररोज लवंगाचे पाणी सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्याही कमी होतात.

Clove water | esakal

प्रतिकारशक्ती वाढते

दररोज सकाळी लवंगाच्या पाण्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.

Clove water | esakal

डोकेदुखीपासून आराम

जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या असेल तर १० दिवस लवंगाचे पाणी पिऊन पहा. त्यामुळे डोक्यावरील ताण कमी होतो आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो.

Clove water | esakal

तोंडाची दुर्गंधी दूर होते

दररोज सकाळी लवंगाचे पाणी प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.

Clove water | esakal

दात-दुखीपासून आराम

जर तुमचे दात दुखत असतील तर लवंगाचे पाणी प्यायल्याने दात-दुखीपासून आराम मिळतो.

Clove water | esakal

गॅसपासून आराम

जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर तुम्ही या पाण्याचे १० दिवस सेवन करू शकता.

Clove water | esakal

असे सेवन करा

यासाठी ५ लवंग एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवंग काढून हे पाणी हळूहळू प्या.

Clove water | esakal

Recipe: वजन कमी करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतं हे स्वादिष्ट सॅलड

salad | esakal
येथे क्लिक करा