तजेलदार त्वचेसाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर आहे किवी

Monika Lonkar –Kumbhar

किवी

किवी हे फळ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

किवीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर्स आणि इतर पोषकघटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळून येतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

किवीचे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

हाडांना मिळते बळकटी

किवीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअमचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, किवीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा तर मिळते शिवाय, हाडांना बळकटी मिळते.

पचनक्षमता सुधारते

शरीराची पचनक्षमता सुधारण्यास किवी लाभदायी ठरते. ज्यांची पचनक्षमता कमकुवत आहे किंवा, ज्यांना पोटाच्या समस्या आहेत. त्या लोकांनी आहारात किवीचा जरूर समावेश करावा.

त्वचेसाठी फायदेशीर

किवीमध्ये व्हिटॅमिन सी चे विपुल प्रमाण आढळते. त्यामुळे, त्वचा चमकदार ठेवण्यास मदत होते. शिवाय, त्वचेचे छान टोनिंग होते.

चांगली झोप येते

वाढत्या कामाच्या ताणामुळे झोपेच्या समस्या निर्माण होत आहेत. किवीचे सेवन केल्याने चांगली झोप येण्यास मदत होऊ शकते.

Benefits Of Watermelon : उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे भरपूर फायदे

Benefits Of Watermelon | esakal
येथे क्लिक करा.