Monika Lonkar –Kumbhar
पीनट बटर हे शेंगदाण्यांपासून तयार केले जाते.
अनेक जण सकाळच्या नाश्त्यामध्ये ब्रेड किंवा टोस्टला पीनट बटर लावून खातात.
साधारण बटरच्या तुलनेत हे पीनट बटर आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते. पीनट बटरचे फायदे कोणते? चला जाणून घेऊयात.
हाडांच्या बळकटीसाठी तुम्ही रोजच्या आहारात पीनट बटरचा जरूर समावेश करा.
फायबर्स आणि मॅंग्नेशिअमनेयुक्त असलेले हे पीनट बटर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.
पीनट बटरचे सेवन केल्याने फार काळ भूक लागत नाही. शिवाय, वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी पीनट बटरचे सेवन करणे फायदेशीर आहे.