Monika Lonkar –Kumbhar
पनीर खायला सगळ्यांनाच आवडते. दुधापासून बनवला जाणारा हा पदार्थ आपल्या सर्वांच्या आहाराचा महत्वाचा भाग आहे.
पोषकघटकांनी परिपूर्ण असलेल्या पनीरपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात.
पनीर आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कच्चे पनीर खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. कोणते आहेत हे फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.
कच्च्या पनीरचा आहारात समावेश केल्याने फॅटी लिव्हरची समस्या दूर होण्यास मदत होते.
पनीरमध्ये प्रोटिन्स आणि कॅल्शिअमचे भरपूर प्रमाण आढळते. कच्च्या पनीरचे सेवन केल्याने हाडांना बळकटी मिळते.
कच्च्या पनीरचे सेवन केल्याने शरीराची सूज कमी होण्यास मदत होते.
कच्च्या पनीरचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.