चिंच खाण्याचे 'हे' आहेत फायदे, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

चिंच ही आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर ठरु शकते.

चिंचेमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि फायबर हे पौष्टिक घटक असतात.

चिंचेचे सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो.

चिंचेमुळे पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत होते.

चिंचेमध्ये हायड्रोक्सिल अ‍ॅसिड जास्त प्रमाणात असते.

या अ‍ॅसिडमुळे शरीराची चरबी कमी होण्यास मदत होते.

शरीरामधील सूज कमी करण्यास देखील चिंच फायदेशीर ठरु शकते.

चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासही मदत होते.