Monika Lonkar –Kumbhar
अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे आणि पोषकतत्वांचे विपुल प्रमाण आढळते.
पोषकतत्वांनी परिपूर्ण असलेले अक्रोड खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
अक्रोडचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
अक्रोडचे सेवन केल्याने ताण-तणाव कमी होऊन मूड सुधारतो.
अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर्सने समृद्ध असलेल्या अक्रोडचे सेवन केल्याने हाडांना बळकटी मिळते.
अक्रोडमध्ये असलेल्या फायबर्समुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते अन् पचनक्षमता सुधारते.
अक्रोडचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.