Monika Lonkar –Kumbhar
बडीशेप खाल्ल्यामुळे जेवण नीट पचते असे मानले जाते. त्यामुळे, जेवण केल्यानंतर आवर्जून बडीशेप खाल्ली जाते.
स्वयंपाकघरात अनेक खाद्यपदार्थ बनवण्यासाठी बडीशेपचा वापर केला जातो.
माऊथ फ्रेशनर म्हणून वापरली जाणारी ही बडीशेप आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
बडीशेपमध्ये आढळणारे जीवनसत्त्वे आणि खनिजे हाडांची रचना आणि ताकद वाढवण्यास मदत करतात.
बडीशेपमध्ये असलेले पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे घटक रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी करू शकतात.
बडीशेपचे पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.
बडीशेपचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अपचन आणि सूज यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होऊ शकतात.