आशुतोष मसगौंडे
बहुतेक वेळा आपण साल काढून किवी खातो, पण जर आपण किवी सालीसोबत खाल्ली तर जास्त चांगलं असतं. कारण किवीच्या सालीमध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.
जर आपण किवीची साल काढून टाकली तर आपण भरपूर प्रथिने कचऱ्यात टाकतो आणि त्यामुळे आपल्याला किवी खाण्याचा पूर्ण फायदा मिळत नाही.
किवी हे अतिशय चविष्ट आणि औषधी फळ आहे. यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. डेंग्यू तापामध्ये याचे सेवन खूप फायदेशीर आहे.
किवी सालीसह खाल्ल्याने तुम्हाला फायबर, फोलेट, व्हिटॅमिन ई आणि सी सारखे आवश्यक पोषक घटक मिळतात.
सालासह किवी खाल्ल्याने रोगांशी लढण्याची ताकद मिळते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी चे गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत.
व्हिटॅमिन सी, पॉलीफेनॉल आणि पोटॅशियमने समृद्ध असलेल्या किवी सालीसह खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
किवीच्या सालीमध्ये चांगले फायबर असते. अशात याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.