Monika Lonkar –Kumbhar
उन्हाळ्यात हमखास प्यायले जाणारे पेयं म्हणजे लस्सी होय.
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी लस्सी अतिशय फायदेशीर आहे.
कार्बोहायड्रेट्स, सोडिअम, प्रोटिन, कॅल्शिअम आणि फायबर्सनेयुक्त असलेली लस्सी स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी ही लाभदायी आहे.
उन्हाळ्यात गोड आणि आंबट लस्सी प्यायल्यास तोंडाला नक्कीच चव येते. याशिवाय तुमची पचनक्रियाही मजबूत होते.
लस्सी प्यायल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.
लस्सी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात अनेकदा उन्हामुळे मन अस्वस्थ होते. अशा स्थितीमध्ये लस्सी प्यायल्याने मन शांत होते आणि तणाव दूर होतो.